top of page

'Being कलाकार' मधून स्वतः घडताना - सांगतोय 'युवराज विवेक ताम्हनकर''यशराज कलामंच' या संस्थेतर्फे लोककला क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे शाहीर श्री विवेक ताम्हनकर, आणि नृत्यांगना सुस्मिता ताम्हनकर यांचा सुपुत्र आणि स्वतः अतिशय गुणी आणि तितकाच नम्र असलेला कलाकार 'युवराज विवेक ताम्हनकर' सांगतोय त्याच्या स्वतःचा YouTube Channel, 'Being कलाकार' बद्दल. उत्तम हेतू आणि योग्य सादरीकरण यांचा सुंदर मिलाफ साकारण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या युवराजशी टीम 'शुभसूरपीडिया'ची झालेली बातचीत वाचूया आजच्या लेखात.


१. तुझी स्वतःची शैक्षणिक आणि कलेच्या शिक्षणाची पार्श्वभूमी काय आहे?


मी डोंबिवलीच्या IES चंद्रकांत पाटकर विद्यालयातून KG ते १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले

११वी ते TY पर्यन्त चे शिक्षण मी जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे (ठाणा कॉलेज) इथून घेत आहे.

मी या वर्षी TYBA (तृतीय वर्ष कला शाखेत) प्रवेश घेतला. आणि मराठी साहित्य या विषयात graduation करत आहे.

लहानपणापासूनच कलेचं वातावरण घरी होतं त्यामुळे आपसूकच कला माझ्यात भिनत गेली.

माझे वडील शाहीर श्री विवेक विनायक ताम्हनकर, यांच्या सोबत मी आग्रा, ओरिसा, जयपूर या ठिकाणी महाराष्ट्रच प्रतिनिधित्व करत National prizes मिळवले आणि त्यातून मी स्वतःत नवीन गोष्टी घडवत गेलो.

विक्रम गोखले, विद्या पटवर्धन, देवेंद्र पेम, पुरुषोत्तम बेर्डे, राजीव छुरी, स्पृहा जोशी, शरद पोंक्षे, मोहन जोशी अश्या दिग्गज मंडळींकडून मला अभिनयाचे प्रशिक्षण मिळाले

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या अभिनय शिबिरात ६००० विद्यार्थी audition साठी आले आणि त्या ६००० मधून पहिल्या ५० कलाकारांची निवड करण्यात आली आणि त्यात मी सुद्धा सिलेक्ट झालो आणि त्याही शिबिरातून माझा सर्वांगीण विकास होत गेला

मी १०वीत असतानाच मला एका मराठी चित्रपटासाठी निवडण्यात आलं. अभ्यास सांभाळून तो चित्रपट मी पूर्ण ही केला. तेव्हा आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला म्हणून अभ्यास आणि चित्रपट दोन्ही चा मेळ मी साधला आणि १०वीत ८५% मार्क मिळवले आणि संस्कृत विषयात 2nd रँक ही मिळवला.

मुंबई मराठी साहित्य संघ यातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खड्ग त्याच दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शक श्री प्रमोद पवार यांनी केलं होतं त्यात माझी निवड झाली आणि ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक.

मी १२वीत असतानाच हे नाटक मला मिळालं. तेव्हा ही आई बाबांनी मला support केला उत्साह वाढवला आणि १०वी प्रमाणेच १२वीत ही मी ८६% गुण मिळवून मराठी, संस्कृत आणि Economics या विषयात First rank मिळवला आणि Economics या विषयात मेरिट होल्डर ठरलो

समाजात कसं वावरावं, कलाकारांमध्ये, रंगभूमीवर कसं वावरावं या सगळ्याचं शिक्षण मला माझे आई वडील आणि आलेल्या अनुभवांनी शिकवलं.


२. Being कलाकार कसं सुचलं आणि ते नक्की काय आहे?


लहानपणापासूनच मी पाहत आलो होतो की जे नाव मिळवलेले कलाकार आहेत त्यांच्यावर अनेक दिग्दर्शक जास्त भर देत होते. नवीन उभरत्या कलाकारांना बरेच वेळेला डावललं जायचं अर्थात अनेक वेळा मला ही अनुभव आलेत तसे. महाविद्यालयात आल्यानंतर नाटक करतानाही जे अनेक वर्षे महाविद्यालयात आहेत नाटकात काम करतायत त्यांना प्रमुख भूमिका मिळायच्या, नवीन मुलांना practically जास्त शिकायला मिळत नव्हतं. आणि याच उद्देशाने नवीन तरुणाना आपली कला सादर करता यावी, लोकांपर्यंत त्यांनी पोहोचावे आणि हे करतानाच काहीतरी उत्तम आणि informative लोकांना द्यावे म्हणून Being कलाकार हा YouTube Channel सुरू केला.

या चॅनेलमुळे माझा आत्मविश्वास अनेक पटीने वाढला.


३. आत्तापर्यंत Being कलाकारकडून केलेले प्रोजेक्ट्स कोणते आहेत आणि त्यांना मिळालेला रिस्पॉन्स कसा आहे याबद्दल काय सांगशील?


Being कलाकार तर्फे काव्यरंजन ज्या मध्ये एक कविता माझी स्वरचित आणि एक कविता एक दिग्गज कवीची मी स्वतः सादर करायचो. त्यानंतर भक्तीरंजन ही सेगमेंट सुरू केली ज्या मध्ये महाराष्ट्रातील संतांवर माझे वडील निरूपण करायचे आणि सुराज सोमण हा या संतांनी रचलेले अभंग गायचा. थोडक्यात भक्तीपूर्ण अशी ही segment केली.

त्या नंतर लेखमाला ही एक वेगळी segment, एक वेगळा प्रकार आणायचा प्रयत्न केला ज्यामध्ये माझे वडील महाराष्ट्रतल्या लोककलेबद्दल बोलायचे आणि जिथे जमेल तिथे practical दाखवायचे. ज्यामध्ये लोकनृत्य, लोकवाद्यं आणि लोकसंगीत असा समावेश झालेला आहे. आता पुढे लेखमालेमध्ये अनेक नवीन नवीन गोष्टी येताना प्रेक्षकांना दिसतील.

त्यानंतर कथारंजन ही सेगमेंट introduce केली. या मध्ये आमच्या महाविद्यालयात जे तरुण उत्तम वक्ते आहेत, जे स्वतः उत्तम लिहितात अशा तरुणांसोबत कथाकथनाची ही segment सुरू केली. या मध्ये किमया तेंडुलकर ही मराठी कथा कथन करते, फरीयल सय्यद ही हिंदी कथा कथन करते आणि सौरभ चव्हाण हा इंग्लिश कथा कथन करतो. या तरुणांनी लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी माझा हा खटाटोप.

या नंतर आषाढी एकादशी निमित्त आम्ही एक अभंग सप्ताह साजरा करायचं ठरवलं ज्याला नाव दिलं वाट पंढरीची. या मध्ये डोंबिवली आणि बाहेरील जे गायक कलाकार आहेत अभिजित केतकर, सृष्टी कुलकर्णी, संपदा माने, ओमकार प्रभुघाटे, विराज साने, शर्वरी बापट, प्राजक्ता शेंद्रे, यांनी वेगवेगळे अभंग गाऊन पाठवले, गंधार जोग, ईशान भट यांनी त्यांच्या घरून तबला वाजवून shoot करून पाठवला आणि अथर्व चांदोरकर याने हार्मोनियम वाजवून पाठवली आणि या सगळ्याच mixing मी स्वतः घरी केलं आणि मग साकार झाली वाट पंढरीची. मुख्य उद्देश हा होता की या corona च्या नकारात्मक लाटेमध्ये, विठ्ठल नामाने सकारात्मकता यावी म्हणून ही सेगमेंट मी आणली.

सुरुवात केली तेव्हा मनासारखा रिस्पॉन्स नव्हता कारण हे informtive गोष्टी आणण लोकांना पटकन पचत नाही. Jokes, comedy, roasting या गोष्टींमध्ये तरुण रमले होते. पण सातत्य ठेवल्यामुळे आज शून्यापासून सुरू करून ६००+ सबस्क्राईबर्स पर्यंतचा टप्पा गाठला आहे.


४. Being कलाकारचे फ्युचर प्लॅन्स किंवा प्रोजेक्ट्स कसे असतील? आणि भविष्यात exactly काय म्हणून Being कलाकारचा स्कोप वाढवायचाय ?


Future plans तसे बरेच आहेत पण ते देखील informative असतील आणि नवीन नवीन तरुणांना घेऊन करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक कलेच्या कलाकाराला being कलाकार या संस्थेतर्फे समोर येण्यासाठी आम्ही कार्यरत असणार आहोत.

भविष्यात Being कलाकार ही संस्था तरुण कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठीच कार्य करत राहील.

गरजू कलाकारांना मदत आमच्या परीने मदत करून त्यांना कले पासून लांब न जाऊ देण्याचा प्रयत्न करत राहू.

नवीन नवीन चांगल्या गोष्टी, माहितीपूर्ण गोष्टी लोकांपर्यंत आणणारं, प्रत्येक कलेचा मेळ असलेलं असं चॅनल म्हणून Being कलाकार ला पहायची इच्छा आहे.


कलाकार म्हणून एक क्लियर व्हिजन नजरेसमोर असणं आणि ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी मेहनतीने झटून काम करणं या दोन्ही गोष्टी युवराजच्या ठायी पुरेपूर दिसतात. आईवडिलांचा भक्कम पाठिंबा आणि सुयोग्य मार्गदर्शन ही मोलाची पुंजी आहे त्याच्यासाठी. कलाक्षेत्रात नक्कीच काहीतरी चांगली कामगिरी करून दाखवण्याची खात्री बाळगून 'शुभसूरपीडिया'तर्फे युवराजला खूप शुभेच्छा!


- टीम शुभसूरपीडिया


#beingkalakar #artist #yuvrajtamhankar #yashraj #kalamanch #youtubechannel #youtuber #youtubeartist #folkarts

349 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page