top of page

Content Types That Musicians Can Upload On YouTube


कधी कधी म्युझिक आर्टिस्ट्सना असं वाटतं की ठीक आहे चॅनल तर सुरू करू पण त्यावर सातत्याने काय अपलोड करणार? गाईज तुमच्या याच प्रश्नासाठी मी काही कॉन्सेप्ट ऑप्शन्स घेऊन आले आहे.


बऱ्याच जणांना युट्यूब म्हणजे टाईमपास, मनोरंजनाचं माध्यम वाटतं. किंवा युट्यूबवर व्हिडियोज अपलोड करणं हे कमीपणाचं वाटतं. पण डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता युट्यूबला पर्याय नाही. म्युझिक आर्टिस्ट्सना तर नाहीच नाही. आज जर कुठल्याही कलाकाराचा युट्यूब प्रेझेन्स नसेल तर ते त्याच्या कामाच्या प्रमोशनसाठी मारक ठरू शकतं! शिवाय उत्तम प्रकारे ग्रो झालेला युट्यूब चॅनल एका साईड बिझनेस आणि पर्यायाने उत्पन्नाची संधीही मिळवून देतो.


तसंच हल्लीच्या स्मार्टफोन्समध्ये व्हिडियो शूट आणि ऑडियो रेकॉर्डिंग बऱ्यापैकी डिसेंट लेव्हलचं होत असल्याने चॅनलच्या सुरुवातीपासून महागड्या इक्विपमेंटमध्ये इन्व्हेस्ट करायची गरज नसते. शिवाय अनेक व्हिडियो एडिटिंग apps सहज अव्हेलेबल असतात. त्यामुळे फक्त मोबाईलला जोडला जाणारा एखादा बेसिक मायक्रोफोन जरी घेतलात तरी तेवढ्यावर चांगला व्हिडियो तयार होऊ शकतो.


म्युझिक आर्टिस्ट्सना सहज करता येण्यासारख्या काही आयडियाज / कॉन्सेप्ट आज या व्हिडियोमध्ये आपण बघणार आहोत.

त्यातलीच सगळ्यात पहिली आणि सोपी कॉन्सेप्ट -


१. कव्हर सॉंग्ज - सगळ्यात पॉप्युलर आणि सहज करता येण्यासारखा हा प्रकार आहे. गायक आणि वादक दोघेही वेगवेगळ्या फेमस गाण्यांची कव्हर्स करून त्यांच्या चॅनल वर अपलोड करू शकतात. कराओके ट्रॅक लावून, किंवा कोणी वादक मित्र असतील तर त्यांच्याबरोबर, किंवा फक्त बेसिक तानपुरा लावूनही कव्हर सॉंग्ज तयार करता येतील. वादक कलाकारांसाठी इन्स्ट्रुमेंटल कव्हर हा सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. फक्त एक काळजी घ्यायला हवी गायक आणि वादक दोघांनी. कव्हर सॉंग अपलोड करताना ओरिजिनल गाण्याचे क्रेडीट्स देणं गरजेचं आहे. कर्टसी म्हणून आणि कॉपीराईट्सचं उल्लंघन टाळण्यासाठी म्हणूनही. या क्रेडिट लिस्टमध्ये ओरिजिनल गायक, संगीतकार, गीतकार, फिल्मसॉंग असल्यास फिल्म आणि म्युझिक कंपनी या सगळ्यांची नावं देणं अत्यावश्यक आहे. कॉपीराईट स्ट्राईकची शक्यता असते आणि स्ट्राईक आल्यावर व्हिडियो डाऊन होतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये ओरिजिनल क्रेडिट लिस्ट नक्की मेंशन करा.


२. ओरिजिनल सॉंग्ज - जे संगीतकार असतील त्यांना स्वतः तयार केलेली गाणीही त्यांच्या युट्यूब चॅनलवर अपलोड करता येतील. मग ती प्रॉपर अरेंज केलेली, स्टुडियो रेकॉर्डेड असतील, किंवा फक्त हार्मोनियम, कीबोर्ड, गिटार यातलं एखादं वाद्य घेऊन तुम्ही स्वतः किंवा तुमच्या गायक वादक मित्रांसोबत घरच्या घरी रेकॉर्ड केलेली असतील. घरी रेकॉर्ड करताना फक्त ऑडियो व्यवस्थित क्लिअर रेकॉर्ड होईल याची काळजी घ्या. कारण म्युझिकमध्ये ऐकणं हे सगळ्यात जास्त प्रायोरिटीचं आहे. त्यामुळे आपल्याकडून ऑडियन्सला दिला जाणारा लिसनिंग एक्सपिरियन्स सगळ्यात महत्त्वाचा!


३. ट्रेनिंग व्हिडियोज - बऱ्याच कलाकारांना स्वतः परफॉर्म करण्यासोबतच शिकवण्याची किंवा आपल्या ज्ञानाचा दुसऱ्यांना फायदा करून देण्याची आवड असते. त्यांच्यासाठीही युट्यूब हा करेक्ट प्लॅटफॉर्म आहे. कारण असे अनेक नवीन होतकरू असतात ज्यांना कलेची आवड असते, पण कारणाने क्लास लावून शिक्षण घेणं शक्य होत नाही. आणि ते युट्यूबवर व्हिडियोज सर्च करत असतात. अशा वेळी आपल्याकडून जर उपयोगी कॉन्टेन्ट अपलोड केलेला असेल आपल्या चॅनलवर तर त्याचा फायदा नक्कीच नवीन होतकरूंना होऊ शकतो. आणि तसंही म्हणतातच की ज्ञान वाटल्याने वाढतं. शिवाय असे व्हिडियोज अपलोड केल्याने तुम्हांला तुमच्या क्षेत्रात एक्सपर्ट म्हणून एस्टॅब्लिश व्हायला नक्कीच मदत होईल.


४. रियाज सेशन्स - योग्य रियाज हा आपल्या कलेमध्ये जास्तीत जास्त परफेक्शनजवळ पोचण्यासाठी अतिशय महत्वाचा आणि गरजेचा असतो. तुम्ही स्वतः रियाज करत असताना त्याचे व्हिडियोज करून अपलोड करणं हे ही नवीन होतकरूंना मार्गदर्शक ठरू शकतं. त्यासोबतच रियाज करण्यासाठी लागणारी जी टूल्स असतात, म्हणजे लेहरा, ठेका, तानपुरा, वेस्टर्न म्युझिकसाठी बॅकिंग ट्रॅक्स, इत्यादी गोष्टी तुम्ही इतर कलाकारांसाठी उपलब्ध करून देऊ शकता. वेगवेगळ्या स्केल्समधल्या, वेगळ्या टेम्पोच्या या ट्रॅक्सचा इतर कलाकारांना रियाज करण्यासाठी खूप उपयोग होतो. त्यामुळे अशा ट्रॅक्सना डिमांडही बऱ्यापैकी जास्त असते. शिवाय तुम्ही ऑडियन्स पोल घेऊन ऑन डिमांड कस्टमाईझ केलेले ट्रॅक्ससुद्धा प्रोव्हाईड करू शकता.


५. रिव्ह्यू व्हिडियोज - हा एक वेगळा पण उपयुक्त असा कॉन्टेन्ट प्रकार आहे. जी इन्स्ट्रुमेंट्स किंवा इक्विपमेंट तुम्ही वापरता रेग्युलरली, त्याचा रिव्ह्यू तुम्ही शूट करून तुमच्या चॅनलवर अपलोड करू शकता. रिव्ह्यू व्हिडियोमध्ये ते इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट कसं काम करतं, साधारण कॉस्टिंग, ते कुठे मिळू शकतं, आणि त्याबद्दलचा तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स याबद्दल बोलायचं असतं. जेणेकरून ती गोष्ट जर बाकीच्यांना खरेदी करायची असेल तर ते तुमच्या व्हिडियोवरून अंदाज घेऊ शकतात. शिवाय यात एक पॅसिव्ह इन्कमची संधीही दडलेली आहे. म्हणजे, समजा एखाद्या माईक किंवा हेडफोन प्रॉडक्टबद्दल तुम्ही रिव्ह्यू व्हिडियो तयार केला, ते प्रॉडक्ट खरेदी करण्याची लिंक व्हिडियो डिस्क्रिप्शनमध्ये दिली, आणि त्या लिंकवर जाऊन तिथून जर कोणी ते खरेदी केलं तर तुम्हांला विक्रेत्याकडून छोटंसं कमिशन मिळतं. याला अफिलिएट इन्कम म्हणतात. फक्त असे व्हिडियोज तयार करताना दोन गोष्टी कटाक्षाने पाळायच्या, त्या म्हणजे तुम्ही स्वतः ते इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट वापरेपर्यंत व्हिडियो करायचा नाही आणि तुमचं जे खरं मत असेल तेच सांगायचं. चांगला वाईट जो अनुभव असेल तो प्रामाणिकपणे सांगायचा. ऑडियन्सला चुकूनही मिसलीड करायचं नाही. तरच तुमच्या रिव्ह्यूवर लोक विश्वास ठेवतील.


६. बिहाईंड द सीन्स किंवा मेकिंग व्हिडियोज - हा एक थोडा गंमतीशीर आणि तुमच्या बाकी कॉन्टेन्टच्या सोबतीने करण्यासारखा प्रकार आहे. गाणी तयार करताना, रेकॉर्डिंग्जच्या वेळी, किंवा ओव्हरऑलच तुम्ही काम करत असताना कधी कधी काही मजेशीर गोष्टी घडतात, किंवा एखादं गाणं तयार होताना कसा कसा प्रवास झाला, याबद्दल ऐकायलाही ऑडियन्सला आवडतं. त्यामुळे ते तुम्ही अशा व्हिडियोजमधून त्यांच्यासोबत शेअर करू शकता. मेकिंग किंवा बिहाईंड द सीन्स व्हिडियोज मधून तुम्ही तुमच्या ऑडियन्सशी थोडं जास्त पर्सनल लेव्हलला कनेक्ट होऊ शकता.


७. तुमच्या क्षेत्रातले अपडेट्स -


या प्रकारच्या व्हिडियोजमधून तुम्ही ज्या करंट घडामोडी तुमच्या क्षेत्रात चालू आहेत त्यासोबत कनेक्टेड राहू शकता. म्हणजे एखादं नवीन आलेलं आणि सुपरहिट झालेलं गाणं, एखादं नवीन सॉफ्टवेअर, एखादा इव्हेंट याबद्दल बोलताना आपसूक तुमच्या त्या व्हिडियोच्या टायमिंगचा फायदाही होऊ शकतो. कारण जो लेटेस्ट विषय असतो त्याबद्दल खूप जण सर्च करत असतात, आणि त्यातलं काही ट्रॅफिक आपल्या व्हिडियोकडे यायचे चान्सेस कैक पटीने वाढतात.


तर फ्रेंड्स, या काही सोप्या आयडियाज होत्या ज्या बऱ्यापैकी सहज करणं प्रत्येकाला शक्य असतं. याव्यतिरिक्त तुम्हांला महत्वाच्या वाटणाऱ्या आयडियाज कमेंट्समधून आम्हांला सांगा. हा व्हिडियो आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्कलमध्ये शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडियोमध्ये, तोपर्यंत गुडबाय. Do follow your passion, everything else will fall in place.


- टीम शुभसूरपीडिया

20 views0 comments
bottom of page