Home Studio Setup Equipments - 2 Types Depending On The Work

म्युझिक क्षेत्रामध्ये, होम स्टुडियो सेटअप करण्याकडे हल्ली बऱ्याच कलाकारांचा कल वाढलाय. गायक, वादकांना तसंच म्युझिक अरेंजर्स आणि प्रोड्युसर्सना घरातून बेसिक रेकॉर्डिंगचं आणि म्युझिक ट्रॅक्स तयार करण्याचं काम करण्यासाठी हा होम सेटअप खूप उपयोगी पडतो. पण बऱ्याचदा असं होतं की नक्की कोणती इक्विपमेंट आपल्यासाठी आपल्या सेटअपमध्ये असणं करेक्ट आहे याबद्दल खूप कन्फ्युजन असतं. याबद्दलच आजच्या पोस्टमध्ये इन्फर्मेशन घेऊन आले आहे.
फ्रेंड्स प्रत्येक कलाकाराला प्रत्येक डिव्हाईसची गरज त्याच्या सेटअपमध्ये नसते. त्यामुळे आपण जे काम करतो त्या अनुषंगाने इक्विपमेंट घेणंच बेटर असतं. आज आपण बघणार आहोत होम स्टुडियो सेटअपचे २ टाईप्स.
१. Acoustic रेकॉर्डिंगसाठी
२. मिडी रेकॉर्डिंगसाठी
१. Acoustic रेकॉर्डिंग -
जे गायक आहेत, किंवा एखादं वाद्य वाजवतात त्यांना त्यांचा आवाज किंवा वाद्य रेकॉर्ड करण्यासाठी या टाईपचा सेटअप आवश्यक आहे. कारण त्यांना त्यांचं रेकॉर्डिंग मायक्रोफोन द्वारे करावं लागेल. त्यामुळे त्यांच्या सेटअपमध्ये लागणाऱ्या मिनिमम गोष्टी -
- कॉम्प्युटर
- रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर
- साऊंड कार्ड
- मायक्रोफोन
- पॉप फिल्टर
- हेडफोन, स्पीकर्स(optional)
- केबल्स आणि कनेक्टर्स
गायक आणि अनप्लग (जे इलेक्ट्रॉनिक नाही ते) वादकांसोबतच कीबोर्ड ऑक्टोपॅड वादकांना त्यांची वाद्यं साऊंड कार्ड थ्रू लाईन आऊट द्वारे रेकॉर्ड करण्यासाठीही याच प्रकारच्या सेटअपची गरज असते. USB माईक असल्यास साऊंड कार्डची गरज नाही. कारण USB माईक डिरेक्टली कॉम्प्युटरला कनेक्ट होतो. बेसिकली साऊंड कार्डची गरज ही माईक कॉम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी असते. पण प्रत्येक USB माईक हा चांगली कॉलिटी देईलच असं नाही त्यामुळे हा पर्याय निवडताना बी केअरफुल.
२. मिडी रेकॉर्डिंग -
जे मिडी कीबोर्डच्या द्वारे सॉफ्टवेअरमधली व्हर्च्युअल इंस्ट्रुमेंट्स रेकॉर्ड करून ट्रॅक्स तयार करणार असतील, आणि ज्यांना acoustic रेकॉर्डिंगची गरज भासत नाही त्यांच्यासाठी बऱ्यापैकी कमी इक्विपमेंट आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांचा सेटअप तयार होतो. यामध्ये साऊंड कार्ड आणि मायक्रोफोनची गरज नसते. या सेटअपमध्ये लागणाऱ्या मिनिमम गोष्टी -
- कॉम्प्युटर
- रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर
- मिडी कीबोर्ड
- व्हर्च्युअल इन्स्ट्रुमेंट्स साऊंड बँक
- हेडफोन्स किंवा स्पीकर्स
सुरुवात करताना जरी तुमच्या सेटअपमध्ये माईक इन्कल्युड केला नाही, तरी जेव्हा शक्य असेल तेव्हा साऊंड कार्ड आणि माईक यांचा समावेश नक्की करा. कारण कधी कधी पटकन डेमोज रेकॉर्ड करायला, फ्रेंड्सपैकी कोणाचं गाणं किंवा वाद्य रेकॉर्ड करण्यासाठी उपयोग होतो.
तसंच, सुरुवातीला बेसिक गोष्टींपासून सुरुवात करा. एकदम मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी छोट्या मोजक्या गोष्टी घ्या. जसजसा तुमचा हात बसत जाईल, किंवा तुम्ही तुमच्या कामात नेक्स्ट लेव्हल गाठाल, त्यानुसार सेटअप अपग्रेड करू शकाल.
- Team ShubhaSurPedia