top of page

How Musicians Make Money Online [7 Passive Income Streams]


म्युझिशियन्सना एखाद्या पॅसिव्ह इन्कम स्ट्रीमची गरज का आहे? किंवा मुळात पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? हे प्रश्न भारतातल्या बऱ्याच म्युझिशियन्सना स्वतःला पडत असतात.

भारतीय म्युझिक इंडस्ट्री अजूनही कोविडच्या इम्पॅक्टमधून पूर्णपणे बाहेर आलेली नाही!

बऱ्याच म्युझिशियन्सचे कोविड काळात प्रचंड हाल झाले....

या सगळ्यावर सोल्युशन काय???


हॅलो गाईज, मी सुखदा भावे-दाबके. मी एक म्युझिक कंपोझर आहे, अरेंजर, प्रोड्युसर, लिरिसिस्ट आहे आणि शुभसूर क्रिएशन्सची फाऊंडर आहे.


आपण जगद्विख्यात बिझिनेसमन वॉरन बफे यांचा एक कोट नेहमी ऐकतो, की 'जर तुम्ही झोपलेले असतानासुद्धा पैसे मिळवण्याचा एखादा सोर्स नाही शोधला तर तुम्हांला तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत पैशांसाठी काम करावं लागेल!' हे तत्व आपल्यासाठी म्हणजेच म्युझिशियन्ससाठीही तितकंच लागू आहे.

मित्रांनो पॅसिव्ह इन्कम म्हणजे असं इन्कम जे तुम्ही actually त्यावेळी काम करत नसताना तुम्हांला मिळत असतं. उदा. अभ्यास करून काही शेअर्स घेऊन ठेवले की जेव्हा त्या शेअर्सची प्राईस वाढते तेव्हा आपोआप प्रॉफिट होतो. म्हणजे ते शेअर्स एकदा घेऊन ठेवले की लक्ष ठेवण्याव्यतिरिक्त पुन्हा त्यासाठी वेगळं काम करावं लागत नाही.


अशीच पॅसिव्ह इन्कम स्ट्रीम ही म्युझिक इंडस्ट्रीमध्येही आहे. आणि अशा सोर्सचा सगळ्यात मोठा फायदा हा की एखाद्या कठीण, कोविड सारख्या सिच्युएशनमध्येही, जेव्हा सगळं ठप्प आहे, तेव्हा हा सोर्स चालू राहू शकतो!


Pandemic सिच्युएशन दरम्यान इंडिपेंडंटली म्युझिक रिलीज करणाऱ्या आर्टिस्ट्स आणि लिसनर्स या दोन्हीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने खूप संधी या क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत.


आज आपण या व्हिडियोमध्ये म्युझिशियन्ससाठी असलेले पॅसिव्ह इन्कमचे सोर्सेस बघणार आहोत.


१. डिजिटल स्टोअर्स


मित्रांनो इंटरनेटच्या माध्यमातून घरी बसून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत तुमचं म्युझिक पोहोचवता येतं, हा या युगाचा म्युझिशियन्ससाठी असलेला सगळ्यात मोठा फायदा आहे. आता आपल्याला कुठल्याही कंपनीवर अवलंबून राहावं लागत नाही आपलं म्युझिक सेल करण्यासाठी. Distrokid, Tunecore, CDBaby यांसारख्या डिजिटल डिस्ट्रीब्युशन वेबसाईट्स थ्रू आपली गाणी Spotify, iTunes, Amazon Music, Google Play आणि अशा अनेक स्टोअर्समध्ये अव्हेलेबल करता येतात. या डिस्ट्रिब्युशन वेबसाईट्सची annual पॅकेजेस किंवा पर सॉंग पॅकेजेस असतात. आपलं म्युझिक सेल झालं किंवा कोणी ऐकलं तर त्यावरच्या रॉयल्टीज आणि विक्रीचं संपूर्ण उत्पन्न, या वेबसाईट्स कोणताही शेअर स्वतःकडे न ठेवता आपल्याला देतात.


२. ऑनलाईन व्हिडियो कोर्सेस


आपली कला दुसऱ्यांना उत्तमप्रकारे शिकवण्याचं स्किल जर आपल्याकडे असेल, तर व्हिडियो कोर्स हा एक जबरदस्त पर्याय ठरू शकतो. एकदाच वर्क करून प्रॉपर पोर्शन आणि स्क्रिप्ट रेडी करून व्हिडियोज शूट केले की ते व्हिडियोज आयुष्यभर तुम्हाला विद्यार्थी आणि पर्यायाने पैसे मिळवून देणारेत. थोडं टेक्निकल नॉलेज या गोष्टीसाठी आवश्यक आहे. पण हल्ली युट्यूबवर सगळ्याची ट्युटोरियल्स उपलब्ध असतात. शिवाय व्हिडियोज तयार करून देणाऱ्या प्रोफेशनल्सची मदतही घेता येऊ शकेल. असे व्हिडियो कोर्सेस एकतर स्वतःची वेबसाईट तयार करून त्यावर होस्ट करता येतील किंवा Teachable, Udemy इत्यादी वेबसाईट्सवरून रन करता येतील. अर्थात त्या त्या गोष्टीची काही ठराविक फी द्यावी लागेल.


३. बीट्स आणि सॅम्पल्स


रॅप आर्टिस्ट्सना त्यांच्या गाण्यांसाठी बीट्स नेहमीच लागत असतात. किंवा असेही आर्टिस्ट्स असतात जे त्यांच्या गाण्यांसाठी रेडी म्युझिक सॅम्पल्स किंवा इन्स्ट्रुमेंट्सचे पॅचेस शोधत असतात. या सगल्यानंही तुम्ही त्यांना हव्या त्या गोष्टी प्रोव्हाईड करू शकता. बीट्स आणि सॅम्पल्स तुम्ही उत्तमरीत्या तयार करत असाल तर Beatstars सारख्या वेबसाईट्सवरून तुम्हांला या गोष्टी सेल करता येतील. यांच्या काही टेक्निकल रिक्वायरमेंट्स असतात, उदा. सॅम्पल रेट, सेपरेट फाईल्स, इत्यादी, पण एकदा का ते तुमच्या सवयीचं झालं की रेग्युलर बेसिसवर तुम्ही तुमचे ट्रॅक्स या साईट्सवर अपलोड करू शकता. अतिशय हाय कॉलिटी साऊंड वापरणं हा बीट्स आणि सॅम्पल्स सेलिंगचा कळीचा मुद्दा आहे.


४. युट्यूब चॅनल


लॉकडाऊनच्या काळात सगळ्यात जास्त पाहिला गेलेला प्लॅटफॉर्म म्हणजे युट्यूब. आणि गुगलनंतरचं दुसऱ्या नंबरचं सर्च इंजिन. इथे लाखो लोक रोज काहीतरी शोधायला येतात. आणि इंस्टा किंवा एफबीसारखं इथल्या व्हिडियोजचं लाईफ मर्यादित नसतं. एखादा व्हिडियो हा ५ वर्षांनंतरही तितकेच व्ह्यूज वर्षाला सातत्याने आणू शकतो. म्हणूनच या प्लॅटफॉर्मपासून लांब राहणं हे स्वतःचंच नुकसान करून घेण्यासारखं आहे.


युट्यूबवर तुमची गाणी, प्रॅक्टिस सेशन्स, तुमच्या क्षेत्रातले अपडेट्स, तुम्हांला असलेलं नॉलेज, टिप्स अशा अनेक विषयांवर व्हिडियोज तयार करून अपलोड करता येतात. यासाठी हा प्लॅटफॉर्म कोणतीही फी आकारत नाही. इन फॅक्ट आपला चॅनल चांगला चालला तर आपल्यालाच मॉनेटायझेशनच्या असंख्य संधी उपलब्ध असतात. शिवाय आपल्याकडे म्युझिक तयार असेल त्यावर व्हिडियो हा अगदी स्मार्टफोन वापरूनसुद्धा तयार, एडिट आणि युट्यूबवर अपलोड करता येऊ शकतो. थोडेसे SEOचे स्किल्स शिकून घेतले की एक युट्यूब चॅनल उत्तम प्रकारे चालवता येतो. Adsense, मेम्बरशिप्स, अफिलिएट मार्केटिंग, आणि स्पॉन्सरशिप्स हे या प्लॅटफॉर्मवरचे मुख्य इन्कम सोर्सेस आहेत.


५. बॅकग्राऊंड म्युझिक ट्रॅक्स


तुम्हांला वेगवेगळ्या इमोशन्सचे, वेगवेगळ्या सिच्युएशन्सना सूट होतील असे सुंदर म्युझिक पीसेस तयार करता येत असतील तर ते सेलिंगसाठी उपलब्ध करून तुम्हांला त्याद्वारे चांगलं इन्कम हाती येऊ शकतं. हे म्युझिक ट्रॅक्स तुम्ही तुमच्या वेबसाइटवरून किंवा ऑडियोजंगल, पॉंडफाय, शटरस्टॉक यांसारख्या वेबसाईट्सवरून सेल करू शकता. यासाठी या वेबसाईट्स काही फी आकारतात. पण एकदा का अशा वेबसाईट्सवर तुमची प्रोफाईल सक्सेसफुल झाली तर तिथून तुमच्या म्युझिक ट्रॅक्सची विक्री सातत्याने होऊ शकते. कधी कधी तर टेलिव्हिजन, वेबसिरीज, नाटकं यासाठीही इथून तुमचं म्युझिक सिलेक्ट होऊ शकतं आणि योग्य त्या फॉर्मलिटीज झाल्यावर तुम्हांला त्याचा चांगला मोबदला मिळू शकतो.


६. ब्लॉग रायटिंग


जर तुमच्याकडे लिहिण्याची कला उत्तम असेल आणि तुम्हांला लिखाण आवडत असेल तर एक म्युझिशियन असूनही तुम्हांला ब्लॉगमधून उत्पन्नाची संधी असते. म्युझिकसंबंधी वेगवेगळ्या विषयांवर चांगलं दर्जेदार लिखाण करून जर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक म्हणजे वाचक खेचून आणण्यात यशस्वी झालात, तर त्या वाचकांपाठोपाठ जाहिरातदारांची रांगही लागणार हे निश्चित! दिवसाला बऱ्यापैकी विझिटर्स असतील तर युट्यूबसारख्याच सगळ्या संधी ब्लॉगसाठीही उपलब्ध असतात. ब्लॉगसुद्धा एकतर स्वतःच्या वेबसाईटवर सुरू करता येतो किंवा मग ब्लॉगस्पॉट, वर्डप्रेस, असे प्लॅटफॉर्म वापरून तयार करता येतो. हल्लीच्या काळात आपली स्वतःची बेसिक वेबसाईट तयार करणं हे तसं बऱ्यापैकी सोपं झालंय. आणि एकदा का रिस्पॉन्स चांगला यायला लागला की योग्य ती प्रोफेशनल हेल्प नक्कीच घेता येते.


अशा लेखांचं पुस्तकही तुम्ही प्रिंट आणि डिजिटल (pdf) स्वरूपात मार्केटमध्ये आणू शकता.


७. मर्चंडाईज


एकदा का तुम्ही म्युझिशियन म्हणून बऱ्यापैकी पॉप्युलर झालात, वरच्या सगळ्या सोर्सेसमधून तुम्हांला यश मिळायला लागलं, नाव झालं, की हा मार्ग तुमच्यासाठी ओपन होतो. तुमचा लोगो, नाव असलेले मग्ज, टीशर्टस, कॅप्स, आणि अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही तयार करून त्याची विक्री करू शकता. तुमचं फॅन फॉलोईंग चांगलं असेल तर तुमच्या लोगोच्या, नावाच्या वस्तू विकत घेण्यासाठी आणि त्या मिरवण्यासाठी तुमच्या फॅन्समध्ये चढाओढ लागू शकते. मर्चंडाईज विक्रीसाठी तुम्हांला लॉजीस्टिक्सची एक फळी तयार ठेवावी लागेल किंवा ते काम आऊटसोर्स करावं लागेल.


गाईज हे बघितले इन्कम सोर्सेस पण हे सगळे सोर्सेस चांगल्या प्रकारे चालण्यासाठी काही स्किल्स तुम्हांला स्वतःमध्ये आणावी लागतील. निदान ते काम दुसऱ्याकडून करून घेण्याची आर्थिक परिस्थिती निर्माण होईपर्यंत तरी.


उदा, तुमचा युट्यूब चॅनल आहे, किंवा व्हिडियो कोर्स आहे, स्पॉटीफाय पेज आहे, तर या सगळ्यांचं थोडंतरी प्रमोशन तुम्हांला करावं लागेल. शिवाय म्युझिक आणि व्हिडियोज अपलोड करण्यात सातत्य ठेवावं लागेल. त्यासाठी तसा प्लॅन लागेल. इंटरनेटची दुनिया ही ३ अक्षरांवर चालते, S-E-O! म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सो तुम्हांला त्याचाही थोडा अभ्यास करावा लागेल. ऑनलाईन यश मिळवणं हे आंब्याच्या झाडासारखं आहे, बी पेरून सुरुवातीला मेहनत घ्यावी लागते, पण एकदा का ते झाड जगलं, चांगलं निघालं, की मग त्याची गोड फळं चाखण्याची मजा काही और असते!


सो गाईज, हे होते आपल्या म्युझिकच्या सात सुरांसारखेच ७ प्रमुख ऑनलाईन इन्कम सोर्सेस. आणि मी रिपीट करीन की आताच्या काळात या सोर्सेसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही!


आज इथेच थांबूया. वर्ल्ड म्युझिक डे च्या तुम्हां सगळ्यांना खूप शुभेच्छा! आजचा व्हिडियो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढल्या व्हिडियोमध्ये, तोपर्यंत गुडबाय. Do Follow Your Passion, Everything Else Will Fall In Place!


- टीम शुभसूरपीडिया

11 views0 comments
bottom of page