top of page

जिंगल विंग्ज - शुभसूर क्रिएशन्स


आपण रोज टीव्ही बघतो. मालिका किंवा फिल्म बघताना कमर्शियल ब्रेक असतो... बऱ्याचदा आपण आवाज म्यूट करतोच, कधी कधी रिमोट लांब असला तर जाहिराती तशाच चालू राहतात..

खरी गंमत यापुढेच आहे....!! टीव्ही बंद केल्यानंतर काही वेळाने, किंवा कधी कधी तर चक्क दुसऱ्या दिवशी आपण एखादी छोटीशी धून गुणगुणत असतो, आणि ती धून म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एका प्रॉडक्टची किंवा सर्व्हिसची जाहिरात असते! आपण चकित होतो अरे हे काय आठवलं आपल्याला मध्येच? बरं एवढ्यावरच थांबत नाही ही गंमत, तर जेव्हा एखादं त्या जाहिरातीत दाखवलेल्यासारखं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस हवी असते आपल्याला तेव्हा बरोब्बर ती धून आणि ते शब्द पुन्हा आठवतात, आणि कधी कधी आपण नकळत तेच जाहिरातीतलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेऊनही टाकतो!

दोस्तहो, आश्चर्यचकित होण्याचं काहीच कारण नाही. कारण ही जादू आणि ताकद आहे संगीताची! कानावर पडलेली एखादी कॅची ट्यून, फक्कडसे जमलेले शब्द आपला मेंदू विसरत नाही पटकन.. आणि योग्य वेळी आपल्याला स्मरण करून देतो. या छोट्याशा गाण्यालाच 'जिंगल' म्हणतात! ही जिंगल म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका असते बरं!! अशीच जादू तुमच्या व्यवसायाची पसरायला हवी असेल तर जरूर आम्हांला संपर्क करा आणि करून घ्या आमच्याकडून एक बहारदार जिंगल खास तुमच्या व्यवसायासाठी!!

शुभसूर क्रिएशन्स ९८१९२०४२३२ www.facebook.com/ShubhaSur.Creations


#jingles #television #advertising #commercialbreak #advertisingjingle #adagency #jinglewings

3 views0 comments
bottom of page