Jugaad in Music Composing #jugaad

एखादं गाणं करताना कधी कधी एवढी गंमत होते म्हणजे फ्रॅंकली पोपट होतो की पुढे काय करायचं याचा जरा विचारच करायला लागतो. एक आरती करताना अशीच गंमत झाली होती ती ऐकूया.
आमच्या घरी रेणुकामातेची एक आरती गायली जाते आणि तिची चाल अतिशय गोड आहे. कधीपासून ती आरती अरेंज करुन युट्यूब चॅनलवर टाकायची इच्छा होती. नवरात्रीच्या निमित्ताने करूया असं ठरवून एक दिवस अरेंजमेंट करायला घेतली, छान झाला होता ट्रॅक. पण सारखं वाटत होतं की हे कशासारखं तरी आहे. आता व्हॉईस रेकॉर्ड करणार एवढ्यात अचानक स्ट्राईक झालं की ही एका अतिशय फेमस गाण्याची चाल आहे त्यावर शब्द बसवलेत!
अशीच्या अशी चाल रेकॉर्ड करणं केवळ अशक्य होतं! पण नवरात्रीसाठी व्हिडियो अपलोड करायचाच होता. मग एक एकदम वेगळा प्रयोग करुन बघायचं ठरवलं. नेहमी चाल तयार होते आणि मग त्यावर ट्रॅक तयार होतो. आता माझ्याकडे ट्रॅक रेडी होता. सो म्युझिक पीसेसची सुरावट आणि कॉर्ड्स ज्या वाजल्या होत्या त्यांचं प्रोग्रेशन या दोन्हीनुसार चाल बांधायला सुरुवात केली. खूपच लिमिटेशन्स होती या पद्धतीने काम करताना. पण ऑप्शनच नव्हता दुसरा. अख्खा ट्रॅक पुन्हा करायला लागला असता. शिवाय त्यानंतर व्हॉईस रेकॉर्ड करुन मिक्सिंग आणि मग व्हिडियो शूट.
नवरात्र चार दिवसांवर आलेलं. त्यामुळे मग खटपट करुन त्या कॉर्ड्स करेक्ट जातील अशी चाल बांधली. मीच गाणार होते त्यामुळे लगेच व्हॉईस रेकॉर्ड केला. आणि तो मग शूट होऊन तो व्हिडियो वेळेत पब्लिशही झाला.
तर असा आयत्या वेळी डिझॅस्टर मॅनेजमेंट करत घडलेला हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आणि कधी कधी असंही करावं लागू शकतं हे मी स्वतःच सॉलिड एंजॉय केलं!
गाईज यासारखी मी एक अख्खी सिरीज करते ज्यात मी म्युझिकक्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या कलाकारांसाठी हेल्पफुल व्हिडियोज तयार करते. स्किल्स, इक्विपमेंट, सॉफ्टवेअर्स अशा वेगवेगळया विषयांवर हे व्हिडियोज असतात. इथे त्या सिरीजची लिंक दिली आहे.
[How To Grow In Music Industry]
नक्की बघा. शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा.
Do follow your passion, everything else will fall in place!