top of page

मी Relaxing Music Videos का तयार करते?


संगीतकार म्हणून मला वेगवेगळे प्रयोग करून बघायला नेहमीच आवडतं. आणि जेव्हा एखादं स्पेसिफिक ओकेजन किंवा सिच्युएशन येते त्यावेळी संगीतकार म्हणून त्या परिस्थितीत मी माझ्याकडून काही कॉन्ट्रिब्यूट करू शकते का यासाठी माझे प्रयत्न नेहमीच चालू असतात.


अशा वेळी सणावारांना त्या त्या ओकेजननुसार गाणं करणं, एखादी सिरीज त्या अनुषंगाने करणं किंवा अगदी स्वच्छ भारतसारखं अभियान जेव्हा अनाऊन्स होतं त्यावेळी मला एखाद्या नवीन गाण्याच्या माध्यमातून त्यात सहभागी व्हायला आवडतं!


आणि एक मोठी अट माझी स्वतःलाच असते, की जे योगदान मी माझ्याकडून करायचा प्रयत्न करतेय ते पॉझिटिव्ह आणि योग्य असायला हवं. नंतर पाच वर्षांनी त्या कामाकडे बघताना मला स्वतःला स्वतःबद्दल चांगलं फीलिंग यायला हवं! आणि बेसिकली त्या कामाचा जर कोणाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली उपयोग झाला तर ते एकदम बेस्ट असतं माझ्यासाठी!


आता हे एवढं मोठं पाल्हाळ लावायचं कारण म्हणजे याच थॉट प्रोसेसमधून कोविड काळात लॉकडाऊन लागलेला असताना शुभसूर क्रिएशन्सच्या युट्यूब चॅनलवर रिलॅक्सिंग म्युझिक ट्रॅक्स सिरीजची सुरुवात झाली.


त्या काळात जेव्हा सगळेच स्ट्रेसमध्ये होते, पुढे काय होणार समजत नव्हतं, कोविडची भीती होती अशा वेळी शांत एकाग्रपणे मेडिटेशनसाठी किंवा जनरल थोडा रिलीफ मिळण्यासाठी आपण शांत म्युझिक तयार करावं असं मनात आलं आणि त्याबद्दल थोडा रिसर्च करायला सुरुवात केली.

अगदी म्युझिक थेरपी किंवा तत्सम विषयात मला खोल शिरायचं नव्हतं कारण त्यासाठी फार वेगळा आणि खूप अभ्यास लागतो पण ओव्हरऑल काही लेख वाचून, काही म्युझिक व्हिडियोज पाहून, म्युझिक ट्रॅक्स ऐकून एवढं निश्चित केलं की जे ऐकून मनाला शांत वाटेल, प्रसन्न वाटेल असं म्युझिक आपण तयार करायचं!


अनेक वर्षं संगीतक्षेत्रात काम करत असल्याने तसे ट्रॅक्स तयार करणं माझ्यासाठी बऱ्यापैकी सोपं होतं. म्युझिक पीसेस तर पटकन तयार झाले पण त्यावर व्हिज्युअल्ससुद्धा आवश्यक होती. मग जसं कानाला छान शांत ऐकून जे वाटतं तसाच अनुभव डोळ्यांनाही मिळायलाच हवा या विचाराने शांत प्रसन्न वाटेल असे फोटोज शोधायला सुरुवात केली. थँक्स टू स्टॉक फोटोज वेबसाईट्स, मला हव्या तशा इमेजेस पटापट मिळत गेल्या आणि एडिटिंग येत असल्याने म्युझिक ट्रॅक्सना इमेजेस आणि लोगो वगैरे लावून साधेच व्हिडियोज तयार केले.


सुरुवातीला इंटरनेटवरून बऱ्याच स्टॉक इमेजेस घेतल्या पण नंतर हळूहळू घरातल्या मेम्बर्सकडूनच इमेजेस मिळायला सुरुवात झाली. गंमत अशी कि माझ्या नवऱ्याला, सासऱ्यांना  आणि बहिणीलाही फोटोग्राफीची प्रचंड आवड आणि उत्तम फोटोज क्लिक करण्याची कलाही अवगत. मग काय त्यांच्या हार्ड डिस्क्स, मोबाईल फोटो गॅलरी हे सगळं पालथं घातल्यावर प्रचंड संख्येने फोटोज मिळाले! बहिणीने सगळे उत्तमरित्या एडिट करून दिले.


इंटरनेटवरच्या स्टॉक फोटोजपेक्षा घरचे हक्काचे फोटोग्राफ्स मिळणं ही केव्हाही कोणत्याही क्रिएटरसाठी पर्वणीच! या म्युझिक व्हिडियोजना आणि म्युझिकला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. हे म्युझिक ट्रॅक्स झोपताना, काम करताना, अभ्यास करताना किंवा अगदी स्वयंपाक करतानाही ऐकले जाऊ शकतात. शांत वाटतंय, मूड चांगला होतोय अशा कमेंट्स बघून प्रोजेक्ट सुरु केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं!


बस, हेच तर हवं असतं नेहमी! आणि अजून अनेक रिलॅक्सिंग म्युझिक व्हिडियोज तयार करायचे आहेत, त्यासाठी स्पेशल शूट करायची इच्छा आहे. या सिरीजसाठी खूप प्लॅन्स आहेत. होतीलच पूर्ण सगळ्यांच्या शुभेच्छांनी! तूर्तास हा लेख इथेच थांबवते.


आमच्या रिलॅक्सिंग  म्युझिक व्हिडियोज सिरीजला नक्की भेट द्या आणि तुमच्या सर्कलमध्ये शेअरसुद्धा करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मनःपूर्वक धन्यवाद!


Relaxing Music Series Playlist -

https://youtube.com/playlist?list=PLKDccW9WtMV-G9-FltnNVrRh_7G0j6RmN


- सुखदा भावे-दाबके261 views0 comments
bottom of page