"म्युझिकल मेसेंजर" - एक शुभेच्छादूत!


'म्युझिकल मेसेंजर'

एक शुभेच्छादूत!

"शुभसूर क्रिएशन्स" या माझ्या कंपनीकडून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. पण अगदी टिपिकल असं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस, असं काही नको होतं. त्यात काहीतरी खास एलमेंट असायला हवं होतं. जे सामान्य लोकांपासून श्रीमंत उद्योजकांपर्यंत आणि कॉलेज गोअर्सपासून अगदी नव्वदीच्या आजीआजोबांपर्यंत कोणीही वापरू शकेल. आणि विचार करता करता गिफ्ट ही गोष्ट डोक्यात आली. गिफ्ट ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक जण कधी ना कधी, कोणा ना कोणाला देतोच! कधी ती वस्तू असते, कधी फुलं तर कधी ग्रीटिंग. पण स्वरूप काहीही असलं तरी एक गोष्ट निश्चित तेवढीच स्पेशल असते ती म्हणजे मनातली भावना! मग म्हटलं, हीच भावना आपण शब्दसुरांमध्ये गुंफली तर? याच विचाराने म्युझिकल मेसेंजरच्या संकल्पनेची सुरुवात झाली आणि ती पुढे जसजशी डेव्हलप होत गेली तसतशी एक वेगळीच म्युझिकल सर्व्हिस आकार घेऊ लागली. आपल्या शुभेच्छा आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचवणारी म्हणजेच दूत आणि संगीतमय म्हणून म्युझिकल, असं "म्युझिकल मेसेंजर" हे नाव सुरुवातीपासूनच मनात घर करून गेलं!


म्युझिकल मेसेंजरला कुठल्याही विषयाचं बंधन नाही. वाढदिवस, सणसमारंभ, आनंदसोहळा, अगदी दिलगिरीसुद्धा, प्रत्येक भावनेला सुरांच्या कोंदणात गुंफता येतं!


एखाद्या व्यक्तीला जर कोणासाठी म्युझिकल मेसेज करायचा असेल तर त्याने आम्हांला संपर्क करायचा. मग त्या व्यक्तीशी बोलून तिला मेसेजमध्ये काय म्हणायचंय ते जाणून घेतो. आणि त्याच भावना शब्दांत बांधून, त्यांना चाल लावून एक छानशी जिंगल तयार करतो. त्या जिंगलमध्ये एखादी जरी गोष्ट त्या व्यक्तीने स्वतः केलेली असेल, उदा. शब्द, चाल किंवा ते म्हणणं, तर या म्युझिकल मेसेंजरला एक वेगळाच आणि खूप स्पेशल असा पर्सनल टच येतो. आतापर्यंत केलेल्या म्युझिकल मेसेजेसनी इमोशनली खूपच धमाल उडवून दिलीय! आणि हा आनंद वाटून मिळणारं समाधान खूप छान आहे. टीम शुभसूरसाठीही हा खूप मस्त अनुभव आहे. 


सध्या म्युझिकल मेसेंजरवर मी आणि माझा लाईफ पार्टनर पराग आम्ही मिळून काम करतोय. लोकांपर्यंत ही कॉन्सेप्ट पोहोचवणं, हेच सगळ्यात कठीण काम आहे. कारण ही संकल्पना एकदम नवीन असल्याने ती रुजायला थोडा वेळ लागेल. पण तो वेळ द्यायची, त्यासाठीची मेहनत घ्यायची तयारी टीम शुभसूरने कधीच केलेली आहे!


​- सुखदा


#musicalmessenger #uniqueservice #newservice #gifting #uniquegift #musicalgift #music #lyrics #gift #celebration

32 views0 comments