top of page

Video Ideas For Music Artists [DIY]



व्हिडियो हे आजच्या काळात एक खूप महत्त्वाचं एलिमेंट झालेलं आहे तुमचं म्युझिक सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी. मग ते युट्यूब असो, इन्स्टाग्राम किंवा फेसबुक. नुसता ऑडियो पोस्ट करणं हे काळाच्या मागे पडत चाललेलं आहे. आणि यात टिकून राहण्यासाठी आपल्या म्युझिक ट्रॅकवर व्हिडियो तयार करण्याच्या काही पॉप्युलर आयडियाज आज मी या व्हिडियोतून माझ्या म्युझिशियन मित्रांसाठी घेऊन आले आहे. तर मग सुरू करूया आजचा व्हिडियो.



हॅलो, मी सुखदा भावे-दाबके, म्युझिक कंपोझर, अरेंजर, प्रोड्युसर आणि शुभसूर क्रिएशन्सची फाऊंडर. आणि या चॅनलवर मी तयार करतेय म्युझिक कलाकारांसाठी उपयोगी अशी व्हिडियो सिरीज. शिवाय या चॅनलवर रियाज ट्रॅक्स, रॉयल्टी फ्री म्युझिक,रिलॅक्सिंग म्युझिक, अशा अनेक उपयुक्त प्लेलिस्ट्स आहेत ज्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील.


तर आज आपण बघणार आहोत काही अशा पॉप्युलर आयडियाज ज्या ऑलमोस्ट अख्खं जग वापरतं आणि त्याच आयडियाज वापरून तुम्हांलाही तुमच्या म्युझिकवर व्हिडियो तयार करून तो सोशल मीडियावर पोस्ट करता येईल.


मित्रांनो आजच्या एपिसोडचा टॉपिक हा इंटरेस्टिंग अशासाठी आहे की यात सांगितलेल्या गोष्टी करत असताना तुम्हांला स्वतःलाही नवीन स्किल्स शिकायला मिळतील, इम्प्लिमेंट करून बघायला मिळतील. ही स्किल्स चांगली डेव्हलप झाली तर नक्कीच तुम्हांला तुमच्या आजूबाजूच्या म्युझिक आर्टिस्ट्सना त्यांच्या व्हिडियोजसाठी मदत करता येईल. अँड यू नेव्हर नो, हा अजून एक इन्कम सोर्स, एक साईड गिगसुद्धा निर्माण होऊ शकेल तुमच्यासाठी! तसंही म्हणतातच की आजच्या काळात मल्टिपल इन्कम सोर्सेस असायला हवेत प्रत्येकाकडे.


आजच्या टॉपिकमधली पहिली आयडिया आहे,


१. शूटिंग - हा ऑप्शन निवडण्यासाठी तुमच्याकडे थोडे जास्त रिसोर्सेस असणं आवश्यक आहे. म्हणजे उत्तम आणि व्हिडियोसाठी एकदम परफेक्ट सूट होणारं लोकेशन, कॅमेरा किंवा अप्रतिम कॅमेरा असणारा स्मार्टफोन, जर इनडोअर शूट करायचं असेल तर लाईट्स सेटअप, कॅमेरा हँडल करणं किंवा सेल्फी शूट, ड्रेस, मेकअप या सगळ्या गोष्टी थोड्या मॅनेज कराव्या लागतील. शिवाय हे शूट केलेलं फुटेज एडिट करण्यासाठी लागणारं व्हिडियो एडिटिंग सॉफ्टवेअर हॅण्डल करणं हे सुद्धा महत्वाचं स्किल आहे. शक्यतो हे व्हिडियोज शूट करताना म्युझिक ऐकत शूट केल्यास एक additional इम्पॅक्ट मिळतो. कारण म्युझिकचा फील घेत घेत शूट होत असतं. शिवाय लिपसिंक असेल तर म्युझिक ऐकण्याची सोय शूटिंग व्हेन्यूला असायला हवी. पण ट्रस्ट मी, हा ऑप्शन तुमच्या गाण्याला बेस्ट न्याय देऊ शकतो. आणि फ्रँकली असे प्रॉपर शूट केलेले व्हिडियोज बघत गाणं किंवा म्युझिक ऐकायला जास्त मजा येते!


२. लिरीक व्हिडियो - तुमच्या गाण्याचा व्हिडियो तयार करण्याची ही एक सोपी पद्धत आहे. पण यासाठी तुम्हाला एडिटिंग सॉफ्टवेअर हाताळण्याची प्रॅक्टिस करावी लागेल. गाण्याच्या विषयाला सूट होईल अशी एखादी इमेज, फोटो घेऊन त्यावर तुम्ही, गाण्याच्या ओळी जशा पुढे सरकतील त्यासोबत त्यांना मॅच करत करत गाण्याचे शब्द लिहू शकता. यात तुम्ही एकापेक्षा जास्त इमेजेससुद्धा वापरू शकता. यात लक्षात ठेवण्यासारखी एक मुख्य गोष्ट म्हणजे जो फॉण्ट तुम्ही सिलेक्ट कराल तो, त्याचा रंग हे सगळं मागच्या इमेजवर व्यवस्थित वाचता येईल असं असावं. फॉण्ट साईज पण खूप छोटी नसावी. तुम्ही लिरिक्स इंग्रजी किंवा देवनागरी अशा कुठल्याही लिपीमध्ये लिहू शकता. पण रिजनल भाषेतलं गाणं असेल तर त्याचे शब्द इंग्रजीमधून वाचायला थोडा त्रास होऊ शकतो.


३. इमेजेस व्हिडियो - लिरिक व्हिडियोपेक्षा हा थोडा सोपा ऑप्शन आहे. यामध्ये वेगवेगळ्या इमेजेस ज्या गाण्याला किंवा म्युझिकला सूट होतील अशा घेऊन त्या सगळ्या एकामागून एक आणून व्हिडियो तयार करता येतो. व्हिज्युअली मस्त वाटेल, गाण्याच्या, म्युझिकच्या फीलला अजून सुंदर इम्पॅक्ट येईल हा एकमेव उद्देश.


४. स्टॉक फूटेज व्हिडियो - अशा काही वेबसाईट्स आहेत जिथे फ्री व्हिडियो क्लिप्स मिळतात. त्या क्लिप्स आपल्या व्हिडियोसाठी आपण वापरू शकतो. फक्त इमेजेसपेक्षा मोशन व्हिडियो असेल तर व्हिडियो अजून अपिलिंग वाटतो. यामध्ये व्हिडियोला स्लो मोशन, स्पीड वाढवून टाईमलॅप्स असे इफेक्ट देता येतात. एडिटिंग मधली काही छोटी छोटी गिमिक्स व्हिडियोची गंमत अजून वाढवतात.


फ्रेंड्स, या चारही आयडियाज वापरताना एक गोष्ट अतिशय कटाक्षाने पाळायचीय ती म्हणजे, कोणतीही इमेज किंवा कोणताही व्हिडियो जो तुम्ही इंटरनेटवरून डाऊनलोड करून वापरताय, त्याचे कॉपीराईट चेक करा. तो फ्रीली वापरायची परमिशन आहे का, त्याचे क्रेडीट्स देणं बंधनकारक आहे का ही सगळी माहिती घेऊन मगच तो व्हिडियो किंवा ती इमेज वापरा. कारण कॉपीराईटचं उल्लंघन बरंच महागात पडू शकतं.


तर या होत्या काही सोप्या आयडियाज ज्या वापरून तुम्ही तुमच्या म्युझिकवर, गाण्यावर व्हिडियो तयार करू शकता. डिझाईनसाठी कॅन्व्हा, व्हिडियोसाठी दा विंची रिसॉल्व्ह, व्हिटा मोबाईल app, ही फ्री टू यूज सॉफ्टवेअर्स वापरू शकता, ज्याच्या लिंक्स तुम्हांला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील.


या आयडीयाज कशा वाटल्या ते आम्हांला कमेंट्स मधून नक्की सांगा. तुम्हांला अजून काही नवीन माहिती असेल तर ते ही आम्हांला ऐकायला आवडेल. व्हिडियो आवडल्यास लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

आजचा व्हिडियो इथेच थांबवू, आपण भेटूया पुढच्या व्हिडियोमध्ये. तोपर्यंत गुडबाय. Do follow your passion, everything else will fall in place!

4 views0 comments
bottom of page