युट्यूबवर स्वतःचा ऑडियन्स कसा निर्माण कराल? नवीन युट्यूबर्ससाठी महत्वाच्या टिप्स!
Updated: Aug 23, 2021

युट्यूब चॅनल यशस्वीपणे सातत्याने कसा चालवायचा याबद्दल नवीन युट्यूबर्ससाठी महत्वाच्या टिप्स!
बऱ्याच लोकांना युट्यूबवर चॅनल तयार करायची इच्छा असते पण तो यशस्वीपणे चालवायचा कसा हे कळत नसतं. मग त्यात कलाकार, entrepreneurs, टीचर्स आणि अशा अनेकांचा समावेश असतो. आज याच विषयावर बोलणार आहे. युट्यूबवर सातत्याने काम करण्यासाठी काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स आज शेअर करणार आहे. सुरू करूया आजचा व्हिडियो.
वेलकम टू शुभसूर क्रिएशन्स. (इन्ट्रो)
● परफेक्शनसाठी थांबून न राहता सुरुवात करा -
आपण कलाकार नेहमीच आपल्या ऑडियन्सला बेस्ट देण्यासाठी प्रयत्नशील असतो. आणि जोपर्यंत आपण आपल्या कलेत एक वरचा क्लास मिळवत नाही, तोपर्यंत आपण आपल्या ऑडियन्स समोर आपली कला पेश करायचा विचारच करत नाही! अगदी योग्य विचार आहे हा, पण या परफेक्शन गाठण्याच्या नादात, कधीकधी आपण वेळ जरा जास्त घालवून बसतो आणि युट्यूब वर वेळ ही फार महत्वाची गोष्ट असते! साधारण ४-५ वर्षांपूर्वी युट्यूबवर स्वतःचा चॅनल तयार करून तो ग्रो करणं जितकं सहज शक्य होतं, त्यापेक्षा बऱ्यापैकी अवघड ते आत्ता झालंय! आत्ता चॅनल तयार करून तो वाढवण्यासाठी बरेच जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. पूर्वीपेक्षा युट्यूबच्या पॉलिसीजही बदलल्या आहेत. पण सोशल मीडिया आणि त्यातही युट्यूब कन्झ्युम होण्याचं वाढतं प्रमाण बघता यापुढच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्म्स हेच पारंपरिक प्लॅटफॉर्म्सपेक्षा कैक पटींनी जास्त वापरले जाणार हे नक्की. आणि असं असताना आपला युट्यूब चॅनल नसणं हे काळाच्या मागे पडण्यासारखं आहे, जे परवडणारं नाही. त्यामुळे युट्यूब प्रवासाची सुरुवात होणं हे खूप महत्त्वाचं आहे. जे येत असेल, त्यातलं बेस्ट घेऊन सुरुवात करा. आपल्या कॅटेगरीमधले बाकीचे चॅनल्स बघून इम्प्रूव्ह करा.
● कंटेंट प्लॅनिंग -
युट्यूब चॅनल क्रिएट करायच्या आधी एक विचार आणि त्यादृष्टीने तयारी व्हायला हवी ती म्हणजे तुम्हांला कशाची आवड, इंटरेस्ट आहे आणि कोणत्या प्रकारचा कंटेंट तयार करायला आवडेल? कारण एखादा विषय सापडला तर त्यावर एखाद दुसरा व्हिडियो पटकन कोणीही करेल, पण जर युट्यूब चॅनल रेग्युलरली चालवायचा असेल, तर तुम्हांला तुमच्या खास आवडीचा, इंटरेस्टचा आणि त्याबद्दल तुम्हांला बऱ्यापैकी माहिती आहे असा विषय शोधायला हवा. तरच तुम्ही त्या विषयावर सातत्याने व्हिडियोज तयार करू शकाल. कारण युट्यूबवर सातत्याने काम करत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. जसं एखाद्या नोकरीमध्ये, रोजच्या रोज कामावर जावं लागतं तेव्हा कुठे महिन्याच्या शेवटी त्याचा मोबदला मिळतो, तसंच युट्यूबचं आहे. जर एक सिरीयस ऑप्शन म्हणून युट्यूबकडे बघायचं असेल, तर मेहनत करायची तयारी हवी, सातत्य हवं!
कंटेंट हा युट्यूबमधला एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जितके चांगले, उपयोगी व्हिडियो तयार कराल, तितका जास्त ऑडियन्स तुमच्या चॅनलवर येईल. चॅनलची सुरुवात करताना, किमान पुढल्या ५० व्हिडियोजच्या आयडियाज जर तुमच्या डोक्यात लगेच येऊ शकत असतील तर याचा अर्थ ही कॅटेगरी तुमच्यासाठी योग्य आहे आणि हा चॅनल तुम्ही यशस्वीपणे चालवू शकाल.
जरी आयडियाज डोक्यात तयार असल्या तरी पुढचं काम तसं कठीण असतं. कारण प्रत्यक्षात व्हिडियो रेकॉर्ड करून एडिट करणं आणि सगळ्या टेक्निकल गोष्टी सांभाळून युट्यूबवर अपलोड करणं हा फार मोठा टास्क असतो. आणि आपला एक स्वतःचा असा ऑडियन्स तयार करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रेग्युलर अपलोड्स करत राहणं! त्यामुळे सुचलेल्या आयडियाज कमीत कमी वेळेत आणि जास्त जास्त चांगल्या पद्धतीने (अर्थात उपलब्ध रिसोर्सेसमध्ये) कशा राबवता येतील याकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे.
● रेकॉर्डिंग आणि एडिटिंग -
जो प्लॅन आत्तापर्यंत तयार केला आहे तो actually implememt करायची इथून सुरुवात होते. आणि हाच भाग सगळ्यात कठीण असतो. तुमचे व्हिडियोज रेकॉर्ड करणं (जर गायक किंवा म्युझिशियन्स असाल त्यानुसार प्लॅन - गरज असल्यास आधी ऑडियो रेडी करून घेणं आणि त्यावर व्हिडियो शूट करणं) आणि रेकॉर्ड झालेले व्हिडियोज एडिट करणं हा या संपूर्ण प्रोसेसमधला सगळ्यात महत्वाचा आणि सातत्यानं करावा लागणारा भाग आहे. त्यामुळे सुरुवातीला तरी हे सगळं करण्याची जी मेथड आहे ती अशी ठेवा की जिचा तुम्हांला कंटाळा येणार नाही. सोप्यात सोप्या पद्धतीने व्हिडियोज तयार करून ते अपलोड करणं हा एकमेव उद्देश डोळ्यांसमोर ठेवून काम करा.
कारण जर व्हिडियोज तयार करण्याची प्रोसेस अवघड असेल तर तुम्ही कालांतराने कंटाळून व्हिडियोज तयार करणं पुढे ढकलू शकता, त्यासाठी कारणं देऊ शकता. शिवाय हे तुम्हांला तुमच्या आवाक्यात कसं ठेवता येईल हे ही बघितलं तर ते चॅनलच्या सुरुवातीच्या काळात सोयीचं ठरेल. शक्यतो यासाठी कोणावर अवलंबून न राहता स्वतःच हे सगळं चांगल्या प्रकारे कसं करता येईल याचा विचार करा. दुसऱ्याकडून करून घेण्यात दोन गोष्टी होऊ शकतात. पहिली गोष्ट जर ती व्यक्ती तेवढ्या इंटरेस्टने ते काम पूर्ण करत नसेल तर व्हिडियोज अपलोड होण्यात उशीर होऊ शकतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे दुसऱ्याकडून काम करून घेताना, त्याचा मोबदला हा दिलाच पाहिजे. पण अगदी सुरुवातीच्या काळात ती इन्व्हेस्टमेंट शक्य झाली नाही तर चॅनलवर व्हिडियो अपलोड होणं कमी होऊ शकतं.
शिवाय आता मोबाईलच्या साहाय्यानेसुद्धा शूटिंग, एडिटिंग हे सगळं करता येतं. बरीच टूल्स, सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. त्या सगळ्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला हवा.
● चॅनल आणि व्हिडियो ऑप्टिमायझेशन -
व्हिडियो तयार झाल्यानंतर तो युट्यूबवर अपलोड करणं हे सुद्धा स्किलफुल काम आहे. आणि त्यासाठी असायला लागतो आपला स्वतःचा युट्यूब चॅनल. फक्त गुगल अकाऊंटच्या साहाय्याने कोणत्याही फीविना आपला चॅनल युट्यूबवर तयार करता येतो. आणि जितक्या सहज आपण WhatsAppवर फाईल शेअर करतो तितक्याच सहज आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडियो अपलोड करता येतो.
पण चॅनल नुसता तयार करून किंवा व्हिडियो नुसता अपलोड करून भागत नाही. या दोन्हीचं ऑप्टिमयझेशन करेक्ट होणं गरजेचं आहे तरच त्याला रीच मिळू शकतो. चॅनल किंवा व्हिडियोचं टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स, थम्बनेल्स, हॅशटॅग्स, या सगळ्या गोष्टी टेक्निकली जितक्या परफेक्ट होतील तितका व्हिडियो गुगल किंवा कोणत्याही सर्च इंजिनच्या SEO च्या निकषांवर जास्त उतरेल!
अर्थात काहीतरी अगदीच कमी दर्जाचा व्हिडियो असेल तर तो या ऑप्टिमयझेशन ट्रिक्सनी व्हायरल होईल असं अजिबात नाही. पण एखादा चांगला व्हिडियो असेल तर तो व्हायरल होण्यासाठी आधी किमान लोकांपर्यंत पोचणं हे या सगळ्या ऑप्टिमयझेशनवर अवलंबून असतं. जेव्हा पहिल्या काही लोकांपर्यंत तो व्हिडियो पोचून त्यांना आवडेल तेव्हा शेअर केला जाईल पण त्यासाठी त्यांना तो दिसला पाहिजे. हे दिसणं हे SEO यशस्वी करतात.
● प्रमोशन -
आजच्या जगात एखादं उत्तम क्रिएशन करून तेवढ्यापुरतं भागत नाही तर ते काम आपण केलंय हेसुद्धा आपल्यालाच जगाला ओरडून सांगावं लागतं. आणि त्यात काहीही वाईट किंवा चुकीचं नाही. म्हणतात ना, बोलणाऱ्याची मातीपण विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही! याच धरतीवर, जबरदस्त प्रमोशन करणाऱ्याचा टुकार व्हिडियोसुद्धा व्हायरल होतो आणि प्रमोशन न करणाऱ्याचा अप्रतिम कॉन्टेन्टसुद्धा अगदीच कमी बघितला जातो.
त्यामुळे चॅनलला एक चांगला सबस्क्रायबर बेस तयार होईपर्यंत अगदी पेड प्रमोट नाही पण निदान आपल्या इतर सोशल मीडिया हँडल्सवरून शेअर करणं, आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना चॅनलबद्दल सांगून त्यांना सबस्क्राईब करायला आणि व्हिडियोज बघायला सांगणं, हे तर नक्कीच करायला हवं.
● रेग्युलर अपलोड्स -
युट्यूबवरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ठराविक कालावधीच्या अंतराने व्हिडियोज अपलोड करत राहणं. कारण पहिल्या दोन पाच व्हिडियोजनंतर लगेच चॅनल ग्रो व्हायला सुरुवात होणार नाही. त्यासाठी किमान पन्नास शंभर व्हिडियोज आवश्यक आहेत. युट्यूब गेममध्ये सातत्य सगळ्यात मोठी भूमिका बजावतं.
पर्यायाने, ज्याला सोप्या मेथड्स ठेवून एका चांगल्या दर्जाचे व्हिडियोज रेग्युलरली पब्लिश करणं जमतंय त्याला युट्यूबवर यश मिळण्याचे चान्सेस इतरांपेक्षा कैक पटींनी जास्त आहेत. जी फ्रिक्वेन्सी ठरवाल ती मेंटेन करा. म्हणजे अगदी महिन्यात दोनच व्हिडियोज अपलोड केले तरी चालतील पण मग कंपल्सरी दोन व्हिडियोज प्रत्येक महिन्याला काहीही झालं तरी चॅनलवर गेलेच पाहिजेत!
आयडियली दर आठवड्याला व्हिडियो अपलोड करणं हे जास्त चांगलं असतं कारण त्याने वर्षात एक बऱ्यापैकी व्हिडियोजची संख्या तुमच्या चॅनलवर तयार होते. अर्थात किती व्हिडियोज अपलोड करायचे हे तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हिडियोज करता त्यावर अवलंबून असतं. कारण कंटेंट स्क्रिप्ट करायला, शूट एडिटला लागणारा वेळ हा लक्षात घेणं गरजेचं आहे.
थोडक्यात सांगायचं तर युट्यूबर होणं म्हणजे अनेक प्रकारची कामं, उदा. स्क्रिप्टिंग, व्हिडियो एडिटिंग, मार्केटिंग, सोशल मीडिया, अशी बरीच कामं निदान सुरुवातीच्या काळात तरी यायला हवीत. एकदा चॅनल ग्रो झाला, की तुमचं कोअर लेव्हल काम सोडून बाकीची कामं एक्स्पर्ट्सकडून करून घेता येतील, पण तोवर, सब कुछ तुम्हीच! अर्थात याची एक दुसरी बाजू म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यायची संधी मिळते! स्किल्स डेव्हलप करणं आणि ती इम्प्लिमेंट करून त्यातून यश मिळवणं यात प्रचंड समाधान मिळतं!
मित्रांनो, युट्यूब हे एक असं पॉवरफुल माध्यम आहे जिथे आपल्याला स्वतःच्या मर्जीने, आपल्याला आवडतो तो कंटेंट अपलोड करण्याची मुभा असते! आणि अर्थात जर आपण आपल्या क्षेत्रात बऱ्यापैकी अनुभवी आणि knowledgebale आणि talented असाल, तर आपल्याला नक्कीच चांगला रिस्पॉन्स मिळतो.
सो या होत्या काही सोप्या गोष्टी ज्या फॉलो करून तुम्ही तुमचा युट्यूब चॅनल यशस्वीपणे चालवू शकता.
- टीम शुभसूरपीडिया
#youtubechannel #youtubegrowth #youtubesuccess #youtubecreator #youtube #YouTube